Pimpri : शहरात प्रतीकात्मक रावण दहन करून विजयादशमी उत्साहात साजरी; ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात दुर्गा मातेला निरोप

एमपीसी न्यूज – दसऱ्यानिमित्त शहरात पिंपरी वाघेरे, पिंपळे सौदागर, भोसरी, सांगवी, चिखली या (Pimpri ) परिसरात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाची देखील दुर्गा मातेच्या निरोपाने सांगता झाली.

शहरात विविध भागांमध्ये सायंकाळी मुख्य मार्गाने डीजे व ढोल ताशाच्या गजरात दुर्गा देवीच्या मिरवणुका काढून नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळाली.

दुर्गादेवीच्या मिरवणुकांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. तर काही ठिकाणी उद्या देवीच्या मिरवणुकीचे नियोजन करण्यात आहे.

Today’s Horoscope 25 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

विजयादशमी निमित्त पिंपरी येथे 70 फुटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तर आणि पिंपळे सौदागर येथे रावणाच्या 120 फुटी प्रतिकात्मक पुतळ्याचे हजारो लोकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.

याठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. तसेच आगीचा घटना घडू नये म्हणून अग्निशमन विभागाच्या वतीने अग्निशामक बंब तैनात ठेवण्यात आले होते. शिवाय रुग्णवाहिका देखील तैनात होत्या.

रावण दहन सोहळ्याच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली. पिंपळे सौदागर येथे अक्षया देवधर, ऋता दुर्गुळे आणि प्रवीण तरडे यांनी उपस्थिती लावून लोकांचे मनोरंजन केले .

तसेच यावेळी विविध स्थानिक कलाकारांकडून नृत्य सादर करण्यात आले. तर पिंपरी येथील रावण दहन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले (Pimpri ) होते. यावेळी तरुणांसह अबालवृद्धांनी देखील हजेरी लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.