Today’s Horoscope 25 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

25.10.2023.

शुभाशुभ विचार- 13 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- पशांकुशा एकादशी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – शततारका 13.30 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ.

————————————

मेष  ( शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात आज काही अनुकूल घटना घडतील. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडे तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर योग्य दिवस आहे.

वृषभ (शुभ रंग- आकाशी)

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणेच योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. आज वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

कर्क (शुभ रंग- भगवा )

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको. नाकासमोर चालणे हिताचे राहील.

सिंह (शुभ रंग- हिरवा)

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदारास अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना आज तुम्ही यशस्वीपणे कराल.

कन्या ( शुभ रंग- लाल )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हीत शत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येत थोडी नरम असेल.

तूळ ( शुभ रंग- निळा)

काही रसिक हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौज मजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक सदस्यांत सूसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज तुम्हाला घरातच सापडण्याची शक्यता आहे.

धनु- (शुभ रंग- क्रीम)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी )

जिथे जाल तिथे आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायद्याची चौकट मोडू नका.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

आज असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो की जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.