Mahabaleshwar : सेल्फीचा मोह बेतला जीवावर, धनकवडी येथील महिलेचा महाबळेश्वरच्या दरीत कोसळून मृत्यू

एमपीसी न्यूज –  पर्यटनस्थळी फोटो काढताना किंवा इतर गोष्टीचा आनंद घेत ( Mahabaleshwar ) असताना पर्यटकांनी योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सेल्फी घेण्याचा मोह एका नवविवाहितेच्या जिवावर बेतला आहे. महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट परिसरात सेल्फी घेत असताना धनकवडी येथील महिलेचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय 23, रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून ठार झाली. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन  अंकिता खाली पडली.

Chakan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

अकिंता चा विवाह हा दहा महिन्यांपुर्वीच रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर यांच्याशी झाला होता. दोघे ही दोन दिवसांसाठी महाबळेश्वर पर्यटनास आले होते.  पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला होता. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

पतीने मात्र पुण्याचा लांबचा प्रवास दुचाकीवरून करावयाचा आहे. खूप वेळ जाईल म्हणून केट्स पॅाईंट न पाहता जाऊ असे अंकितास सांगितले., परंतु तिने हट्ट धरल्याने पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दांपत्य दुपारी साडेचार वाजता केट्स पाँईट येथे पोहचले.

केट्स पॉईंट पाहून ते निडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पॉइंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो व व्हिडीओ काढले, असाच एक धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना ( Mahabaleshwar ) अंकिता ही कठड्यावरून थेट तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात ती जागीच ठार झाली.

पत्नी कोसळताच पतीने आरडाओरडा सुरू केला. हा गोंधळ ऐकून स्थानिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी व जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.