Bhosari : भारत सरकारच्या नोटरीपदी अॅड. अतिश लांडगे यांची निवड

एमपीसी न्यूज – अॅड.अतिश लांडगे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. अॅड.लांडगे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना कमीतकमी खर्चामध्ये नोटरीची कामे करून मिळणार आहेत.

अॅड.अतिश लांडगे हे पुणे व पिंपरी न्यायालयात गेली 10 वर्षे दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे हाताळत आहेत. त्यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत येरवडा कारागृहातील 300 ते 400 आरोपींना मोफत कायदेविषयक सल्ला देऊन न्याय मिळवून दिला आहे.

तसेच गेल्या 2 वर्षांपासून पैशाअभावी वकील देणे शक्य होत नसलेल्या आरोपींना जामिन मिळवून देणे व त्यांची प्रकरणे हाताळणे अशी कामे ते करीत आहेत. अॅड.अतिश लांडगे यांनी बार कोन्सिल महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले असून जयहिंद अर्बन सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.