Nigdi : नागरी सुरक्षा कृती समितीच्या दूतांनी दिली 44 वारकऱ्यांना आरोग्य सेवा

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान उष्णतेचा त्रास जाणवू लागलेल्या वारकऱ्यांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या जलदूत आणि आरोग्य दूतांनी शुद्धजल आणि ग्लुकोजची व्यवस्था करून त्यांना प्राथमिक उपचार दिले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे देहू येथील इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले. यंदा पालखी मार्गावर उन्हाची काहिली वाढलेली होती. त्यामुळे काही वारकरी बंधू आणि भगिनींना उष्णतेचा त्रास जाणवू लागला. तातडीने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या जलदूत आणि आरोग्य दूतांनी शुद्ध जल, ग्लुकोज ची व्यवस्था करून त्यांना प्राथमिक उपचार दिले. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या आरोग्य दूतांचे कौतुक केले.

के एन बी चौक,परंडवाल चौक, अनगडबाबा शाह दर्गा परिसर, शनी मंदिर चिंचोली या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा समितीच्या 20 वाहतूक पोलीस मित्रानी दोन दिवस वाहतूक विभागाला विशेष सहकार्य केले. समिति अध्यक्ष विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली जलदूत म्हणून जयेन्द्र मकवाना, स्वप्निल चव्हाणके, कुलदीप डांगे, अभिजीत जोशी, तुकाराम दहे, मौसमी घाळी, देवयानी पाटील, विभावरी इंगळे, सुलभा धांडे, रजनी बोंडे, अनामिका नारखेड़े, विजया पाटील, अँड विद्या शिंदे, तुकाराम दहे, मनोज ढाके, पटेल रज्जाक यांनी काम पाहिले.

आरोग्य दूत म्हणून बळीराम शेवते, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, नाना कुंबरे, उमेश कांगुडे, प्रदीप पिलाने, सुनील चौगुले, मदन जोशी, ज्ञानेश्वर गोरे, राम सुर्वे, राजकुमार कांबिकर, संदीप सपकाळ, अविनाश भालेकर, मंगेश घाग, संकल्प सुर्यवंशी, सौरभ उत्तेकर, तेजस सापरिया, नितिन मांडवे, विशाल शेवाळे, सतीश मांडवे, अजय घाडी, कपिल पवार, समीर चिले, राहुल लुगड़े, अमित चौहान यांनी काम पाहिले.

वाहतूक पोलीस मित्र म्हणून अमोल कानू, संतोष चव्हाण, अमित डांगे, बाबासाहेब घाळी, राजेश बाबर, अर्चना घाळी दाभोळकर, विजय मुणोत यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा चौधरी, श्रीकांत मोहिते, धीरेन्द्र जाधव, वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.