Bhosari : गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने एमएनजीएल गॅस स्टेशनवर आग

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी येथील अनंत इंटरप्राईजेस यांच्या एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने आग लागली. अग्निशमन विभागाची वेळीच मदत मिळल्याने मोठी हानी टळली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

भोसरी एमआयडीसी येथील एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब, भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काही वेळ कुलिंगचे काम केल्यानंतर एमएनजीएल कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली. कंपनीकडून इनलेट गॅस बंद करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही कामगिरी उप अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, शांताराम काटे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, फायरमन कैलास वाघिरे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर, कृष्णा कदम, कैलास डोंगरे, पुंडलिक भुतापले, संभाजी दराडे, नितीन गोगोले, वाहन चालक विशाल बाणेकर, देवा जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.