Pimpri : पुणे-मुंबई बंद रेल्वेमार्गाचा रस्त्यावर ताण; एक्सप्रेस वे फुल्ल

एमपीसी न्यूज – जोरदार बरसणा-या पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुणे-मुंबई मार्गावर धावणा-या प्रमुख गाड्यांसह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेने प्रवास करणा-या चाकरमान्यांना व इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वल्लभनगर वरून सुटणारी बस दादर स्थानकावर चार ते साडेचार तासात पोहोचत होती. मात्र पावसामुळे त्या बसला पोहोचण्यासाठी साडेसहा ते सात तास लागत आहेत. दादर स्थानकावर पोहोचण्यासाठी देखील बस गाडयांना कसरत करावी लागत आहे. पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने बससेवेला प्रवाशांनी प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी एकूण 30 ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे बस स्थानकावरून देखील ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती वल्लभनगर आगाराचे आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी सांगितले.

रेल्वेमार्ग बंद असल्याने नागरिकांनी रस्त्यावरून जाण्यास पसंती दिली आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग फुल्ल झाला आहे. द्रुतगती मार्गावर गर्दीमुळे घाटात अडकून पडू नये म्हणून अनेक वाहने जुन्या महामार्गावरून जात आहेत. यामुळे द्रुतगती मार्गासह जुन्या महामार्गावर देखील गर्दी आहे.

मुंबई शहर आणि खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने पाच रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तर एक गाडी दुस-या मार्गावरून वळवण्यात आली आहे. तीन रेल्वेगाड्या पुण्यापर्यंत पोहोचून पुण्यातूनच परत फिरणार आहेत. तर काही गाड्या गंतव्यस्थळी न पोहोचता अर्ध्यातूनच परत फिरणार आहेत. हा बदल मंगळवार (दि. 2) पर्यंत असणार आहे.

रद्द केलेल्या गाड्या –

गाडी क्रमांक 11139 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गदग
गाडी क्रमांक 11140 – गदग ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
गाडी क्रमांक 12110 – मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
गाडी क्रमांक 12109 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मनमाड
गाडी क्रमांक 11010 – पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सिंहगड एक्सप्रेस)
गाडी क्रमांक 11009 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (सिंहगड एक्सप्रेस)
गाडी क्रमांक 12124 – पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (डेक्कन क्वीन)
गाडी क्रमांक 12123 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (डेक्कन क्वीन)

वळवण्यात आलेल्या गाड्या –
गाडी क्रमांक 17018 – सिकंदराबाद ते राजकोट (राजकोट एक्सप्रेस) – ही गाडी दादर-मनमाड-जळगाव-सुरत मार्गे वळवण्यात आली आहे. सुरतच्या पुढे गाडी तिच्या नियोजित मार्गावरून जाईल.

अर्ध्यातून परतणा-या गाड्या –
गाडी क्रमांक 17412 / 17411 – कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (महालक्ष्मी एक्सप्रेस)
गाडी क्रमांक 18519 / 18520 –

विशाखापट्टणम ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई (एक्सप्रेस)
गाडी क्रमांक 11140 – गदग ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गदग सीएसएमटी एक्सप्रेस)
वरील तीन गाड्या पुणे स्थानकापर्यंत येणार असून तिथूनच परत फिरणार आहेत.

गाडी क्रमांक 12116 – सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सिद्धेश्वर एक्सप्रेस)
गाडी क्रमांक 11301 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बेंगलोर (उद्यान एक्सप्रेस)
वरील दोन गाड्या दादर पर्यंत आणि पासून सुटणार आहेत.

गाडी क्रमांक 22886 / 22885 – टाटानगर ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई (टाटा एलटीटी अंत्योदय)
ही गाडी इगतपुरी पर्यंत आणि पासून सुटणार आहे.

गाडी क्रमांक 12112 / 12111 – अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (अमरावती एक्सप्रेस)
ही गाडी देवळाली पर्यंत आणि पासून सुटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.