Dehuroad : फुकटचे डोसे खाऊन गाडी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – डोसे आणि उत्तप्पा पार्सल घेतले. त्याचे पैसे न देता मयूर काळभोर याचे नाव सांगून दोघेजण निघून गेले. त्यानंतर मयूर काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी डोसा गाडी चालवणा-याला मारहाण केली. ही घटना ६ जून रोजी धर्मराज चौक, देहूरोड येथे घडली.

वैभव शाम गव्हाणे (वय 32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयूर काळभोर, अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव यांचा डोसा विक्रीचा व्यवसाय आहे. 6 जून रोजी दोन अनोळखी इसमांनी वैभव यांना पाच मसाला डोसा आणि तीन उत्तप्पा पार्सल मागितले. वैभव यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पार्सल दिले. आरोपींनी मयूर काळभोर याचे नाव सांगून बिल दिले नाही. यापूर्वी देखील यांनी असाच प्रकार केला होता. त्यामुळे वैभव यांनी पैसे मागितले.

पैसे मागितल्याचा रागातून मयूर काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून वैभव यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच गाडीजवळ ठेवलेली खुर्ची मोडली. वैभव यांच्या गल्ल्यातील तीन ते चार हजार रुपयांची रोकड आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.