Dehuroad : डेबिट कार्डची अदलाबदल करत 25 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीला (Dehuroad) अनोळखी व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा केला. त्यातून वृद्ध व्यक्तीचे डेबिट कार्ड अदलाबदल करून 25 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता देहूगाव येथे घडली.
आत्माराम गणपत कातकडे (वय 71, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा (Dehuroad) दाखल करण्यात आला आहे.

Sangvi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत पंधरा लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कातकडे हे देहूगाव मधील युनियन बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तिथे आरोपी कातकडे यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना मदत करण्याचा बहाणा करत होता. आरोपीने कातकडे यांचा गोपनीय पिन नंबर पाहिला. त्यानंतर कातकडे यांचे डेबिट कार्ड अदलाबदल करून 25 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.