Nigdi : तडीपार गुंडाला शस्त्रासह पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी परवानगी शिवाय शस्त्र घेऊन पिंपरी चिंचवड शहरात पकडला गेला .ही कारवाई शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली.

 

Dehuroad : डेबिट कार्डची अदलाबदल करत 25 हजारांची फसवणूक

आदित्य किशोर बाविस्कर (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आदित्य बाविस्कर याला 29 ऑगस्ट 2023 पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे कोयता बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आदित्य बाविस्कर याला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.