Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर; कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी तर  मावळ,  पुणे आणि  शिरूर लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार असल्याने  त्यादिवशी मतदारसंघात सुट्टी असणार आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार, ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या (Loksabha Election 2024) क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

Loksabha elections 2024 : जुन्नर परिसरातील आदिवासी भागात मतदान जनजागृती

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन 9 ते 12 एप्रिल दरम्यान होणार विविध कार्यक्रम

या निवडणुकीत मतदानाचा टक्का (Loksabha Election 2024 )  वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.