Talegaon Dabhade : रवींद्र भेगडे यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त गुरुवारी ‘चैतन्य पदस्पर्श’ पादुका सोहळा

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मावळ रवींद्र भेगडे यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त तळेगाव शहरामध्ये गुरुवारी (दि 25) चैतन्य पदस्पर्श पादुका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे येथील बॅलेडोर सोसायटीमध्ये गुरुवारी सकाळी अकरा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आयोजित केलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक सिद्ध शक्तींच्या आणि संत महंतांच्या पादुकांचे आगमन होणार आहे.

त्यात प्रामुख्याने श्री श्रीपाद वल्लभ, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगांव, श्री रामदास स्वामी, श्री शंकर महाराज, श्री टेंबे स्वामी महाराज, नेर्लेकर घराण्याकडे असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय कर्नाटकातील श्री दत्तगुरू करूणाच्या पादुका, पिठापूर पिठाधीश श्री रामा स्वामी, प्रसाद शिवलिंग, श्री सुवर्ण दत्त मूर्ती, श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री नरसिंह सरस्वती नारायण यांच्याही पादुकांचे दर्शन होणार आहे.

तरी भाविकांनी या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र भेगडे यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.