Lonavala : वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार

एमपीसी न्यूज- वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वेहेरगाव येथील तुरे लाॅज याठिकाणी घडली.

मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. कामशेत येथील शिंदे नामक युवकाने हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांच्या हाती मिळाली आहे. वेहेरगाव येथील तुरे लाॅज याठिकाणी ही घटना घडली.

घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील व लोणावळा उपविभागाचे प्रभारी पोलीस अधिकारी टोणपे यांनी घटनास्थळाला भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.