Maval : पवना धरण 67.54 टक्के भरले !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 67.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1600 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. मागील शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाणीकपात रद्द होईल अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करीत आहेत.

पवना धरण माहिती :

गेल्या 24 तासात झालेला पाऊस 64 मि.मि.
1 जूनपासून झालेला पाऊस 1600 मि.मि.
1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 53.08 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2116 मि.मि.
धरणातील आजचा पाणीसाठा 67.54 टक्के (6.85 टीएमसी)
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 96.35 टक्के (8.20 टीएमसी)
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ 4.89 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.