Sangvi : भाड्याने चालवण्यासाठी दिलेल्या कारसह चालक फरार

एमपीसी न्यूज – कार मालकाकडून कार चालवण्यासाठी घेतली. त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले. मात्र, चालकाने तीन महिने कारचे भाडे दिले नाही. तीन महिन्यानंतर चालक कारसह गायब झाला. ही घटना 24 एप्रिल ते 29 जुलै या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

अमित पुरुषोत्तम काळेकर (वय 35, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक ज्ञानेश्वर काकडे (वय 29, रा. बोरिवली पूर्व, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांच्या मालकीची वॅगन आर (एम एच 03 / बी सी 4862) ही कार आहे. ती कार त्यांनी अभिषेक याला चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले होते. 24 एप्रिल रोजी अभिषेक याने अमित यांच्याकडून कार नेली. त्यानंतर त्याने तीन महिने ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाही. त्यानंतर अभिषेक कार घेऊन गायब झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.