११ ऑगस्ट : दिनविशेष

What Happened on August 11, What happened on this day in history, August 11. See what historical events occurred, which famous people were born and who died on August 11.

११ ऑगस्ट : दिनविशेष

११ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

  • ख्रिस्त पूर्व ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले.
  • १८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
  • १९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
  • १९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.
  • १९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
  • १९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
  • १९८७: युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.
  • १९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.
  • १९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
  • १९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
  • २०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

११ ऑगस्ट– जन्म

  • १८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)
  • १९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५)
  • १९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
  • १९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी २००९)
  • १९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.
  • १९४४: फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म.
  • १९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.
  • १९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.

११ ऑगस्ट– मृत्यू

  • १९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)
  • १९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
  • १९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
  • २०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
  • २००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२३)
  • २०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.