Wanwadi : पत्नीवर वार करून ज्येष्ठ नागरिकाची 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – वानवडी येथे पत्नीवर वार करून एका ज्येष्ठ नागरिकाने 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली.

रेखा सुभाषचंद्र अगरवाल (वय 55), असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर सुभाषचंद्र अगरवाल (वय 60, हे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल दाम्पत्यांना मुलगा सून आणि मुलगी आहे. घटनेच्या वेळी मुलगा सून, मुलगी कोणीही घरी नव्हते. यावेळी रेखा व सुभाष यांच्यामध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्याने सुभाष यांनी पत्नी रेखावर चाकूने वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. नंतर त्यांनी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

वानवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.