१२ सप्टेंबर : दिनविशेष

What Happened on September 12, What happened on this day in history, September 12. See what historical events occurred, which famous people were born and who died on September 12.

१२ सप्टेंबर : दिनविशेष

१२ सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
  • १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
  • १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
  • १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
  • १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
  • १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
  • १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
  • १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
  • १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
  • २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
  • २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

१२ सप्टेंबर– जन्म

  • १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.
  • १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.
  • १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.
  • १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)
  • १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
  • १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)
  • १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
  • १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.
  • १९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.

१२ सप्टेंबर– मृत्यू

  • १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.
  • १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
  • १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
  • १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
  • १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
  • १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)
  • १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
  • १९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.
  • १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.
  • १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.