Kasarwadi : रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या धडकेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज (मंगळवारी) कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडल्या.

पहिल्या घटनेत सकाळी साडेदहाच्या सुमारास लोकलच्या धडकेत एकाच मृत्यू झाला. जगदीश काशिनाथ चौधरी (वय 56, रा. शनिवार पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे रूळ ओलांडताना पुणे लोणावळा लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना दुपारी अडीचच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामध्ये एका महिलेचा उद्यान एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. महिलेची ओळख अद्याप पटली नाही. तिचे वय अंदाजे 45 वर्ष आहे. चेहरा गोल, अंगाने मध्यम, रंग गोरा, उंची पाच फूट दोन इंच, केस लाल काळे, अंगावर मेहंदी रंगाची साडी आहे. या महिलेबाबत माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.