Chakan : पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून व्यावसायिकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका व्यावसायिकाला माल खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 एप्रिल ते 26 ऑगस्ट या कालावधीत चाकण (Chakan) मेदनकरवाडी येथे घडली आहे.

Pimpri : महिलेला मारहाण करत अश्लील शेरेबाजी; एकास अटक

दत्ता बबन भोर (वय 36, रा. चाकण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेदांत सेठ उर्फ लोकेश तुकाराम चुते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सुयश ट्रेडिंग ही कंपनी आहे. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जाहिरात केली. त्याचे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने शिवशक्ती एंटरप्राइजेस वेदांत शेठ या नावाने नट बोल्ट पार्ट विकत घेण्याची इच्छा दर्शवली.

त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्याशी व्यवहार करत आरोपीला दोन लाख चार हजार 79 रुपयांचे 35 कार्टून्स बॉक्स डिलिव्हरी केले. यावेळी फिर्यादी यांना आरोपीने पेमेंट केल्याचा खोटाच स्क्रीनशॉट पाठवून पेमेंट झाल्याचे दाखवले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.