Pimpri : महिलेला मारहाण करत अश्लील शेरेबाजी; एकास अटक

एमपीसी न्यूज- महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी(दि. 25) संत तुकाराम नगर येथे घडला.

Chinchwad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

अमर अनिल साळवी (वय 29, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. त्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणी अश्लील शेरेबाजी केली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. .पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.