Chinchwad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मोहन नगर, चिंचवड (Chinchwad) येथे घडली. याप्रकरणी तब्बल आठवडाभराने परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune : द्राक्ष उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात आयुष जितेंद्र मोरे (वय 18, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) यांनी शनिवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद उर्फ सोन्या काळे (वय 22), युवराज रमेश काळे (वय 24), सुमित कमलाकर दाभाडे (वय 21), सोन्या याचा आते भाऊ गवळी (वय अंदाजे 35, पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून आयुष व त्याचा मित्र प्रवीण हिरेमठ यांना थांबवले. त्यानंतर आरोपींनी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्‍यावर वार केला. मात्र आयुष यांनी तो वार चुकविल्याने खांद्यावर कोयता लागून जखमी झाले.

त्यानंतर इतर आरोपींनी दगड उचलून फिर्यादीच्या पायावर मारून जखमी केले. आरोपी अरविंद काळे याने फिर्यादीचा मित्र प्रवीण यासही कोयत्याने मारले. मात्र त्यांनी तो वार चुकविल्याने हाताला जखम झाली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्र दोघेजण पळून गेले. त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात अरविंद काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयुष मोरे, प्रवीण हिरेमठ, विशाल सूर्यवंशी, रोहन खरे, शुभम फडतरे, करण ससाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आपसात संगणमत करून दुचाकीवरून येऊन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली.

तसेच आयुष मोरे यांने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादी अरविंद काळे यांच्या डाव्या हाताच्या बोटावर, उजव्या पायावर कोयत्याने मारून जखमी केले. फिर्यादी यांचा भाऊ युवराज व ते भाऊ बाळासाहेब गवळी यांनी आरोपीच्या तावडीतून फिर्यादी यांची सुटका केली. त्यानंतर आरोपींनी दगडफेक करीत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड (Chinchwad) पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.