Chinchwad : चिंचवडमधून अपहरण झालेल्या मेंढपाळाची बीड जिल्ह्यातून सुटका

एमपीसी न्यूज – आर्थिक व्यवहारातून (Chinchwad) चिंचवडमधून एका मेंढपाळाचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणाचा कसून तपास करत गुन्हे शाखा युनिट दोनने अपहरण झालेल्या मेंढपाळाची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून सुटका केली.

तुकाराम साधू शिंपले (वय 40) असे सुटका केलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर (वय 22, रा. काळ्याची वाडी, ता. धारूर, जि. बीड) याला अटक केली आहे.

Maval : नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाची निर्मिती – हभप भरत महाराज थोरात

पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता धनेश्वर मंदिर चिंचवडगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता तुकाराम शिंपले यांचे अपहरण झाले असून ते बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवून नेण्यात आले होते. कारच्या नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आला होता.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनने या प्रकरणाचा तपास सुरु (Chinchwad) केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये काहीजण आढळून आले. ही गाडी बीड जिल्ह्यात गेल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे एक पथक बीडकडे रवाना करण्यात आले.

तुकाराम शिंपले हे चिंचवड येथे येण्यापूर्वी अंबाजोगाई येथे शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी मध्यस्थी करीत होते. त्यांनी मध्यस्थी केलेल्या व्यवहारातील पैसे खरेदीदाराने दिले नव्हते. त्यामुळे शिंपले यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने, शेती विकून काही लोकांचे पैसे दिले होते. त्यानंतर उपजीविका चालवण्यासाठी ते चिंचवड येथे आले होते.

दरम्यान, ज्ञानेश्वर रुपनर हा व्यक्ती बीड येथून चिंचवड येथे आठ दिवसांपूर्वी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रुपनर याच्यावर पाळत ठेऊन त्याच्या घराची झडती घेतली. घरातील एक खोली कुलूप लाऊन बंद होती. ती उघडली असता तिथे तुकाराम शिंपले आढळून आले. पोलिसांनी शिंपले यांची सुटका करत ज्ञानेश्वर रुपनर याला अटक केली. ज्ञानेश्वर याचा मामा रघुनाथ नरुटे याच्या शेळ्या मेंढ्या विक्रीत शिंपले यांनी मध्यस्थी केली होती. त्यातील 14 लाख रुपये खरेदीदराने दिले नव्हते. त्या रागातून रघुनाथ याच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीदारांनी शिंपले यांचे अपहरण केले होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.