Maval : नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाची निर्मिती – हभप भरत महाराज थोरात

एमपीसी न्यूज – विश्वनाथ, रघुनाथ, द्वारकानाथ, पंढरीनाथ, ज्ञाननाथ, अनाथ (तुकाराम महाराज) असे सहा (Maval) नाथ आहेत. या नाथ संप्रदायतूनच वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली असल्याचे प्रतिपादन हभप भरत महाराज थोरात यांनी केले. मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा हभप भरत महाराज थोरात यांनी सादर केली. यावेळी ते बोलत होते. थोरात महाराज यांनी तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ || कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी || हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता. तुकाराम महाराज यांनी पाहिले नाथ असलेल्या विश्वनाथाला निरोप पाठवून आपले आर्जव सादर केल्याचे थोरात महाराज यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी उपसभापती शांताराम कदम,मावळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष दत्तात्रय पडवळ,हभप सुखदेव महाराज ठाकर, खरेदी विक्री संघाचे संचालक मारूती येवले, रूपेश घोजगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी (मावळ) गुलाबराव खांदवे, माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण, भैरवनाथ सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय घोजगे, ह भ प सचिन आवटे, मृदंगमणी बाळकृष्ण चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण,उद्योजक कैलास पवार, कैलास येवले, सुनील शिंदे,संतोष पिंपळेसह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात महाराज पुढे म्हणाले की, सर्वसमावेशकता निश्चित व्हावी आणि सर्वांना अधिकार मिळावा ह्या हेतूनेच वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. कारण नाथपंथात साधनशुचिता काटेकोरपणे जोपासली जाते. मात्र वारकरी संप्रदायात सकळांसी येथे आहे अधिकार या न्यायाने या संप्रदायात कोणतीच (Maval) बंधने नाहीत.

Pimpri : ठरलं! बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन

समाजातील शोषित घटक तो म्हणजे नाथ. नाथ होणे सोपे नाही. व्यक्ती जीवनाची समीक्षा केली तर ते कळून येईल. नाथांच्या जीवनात फार शोषिकता असते.त्यांना जीवनात किती यातना सहन कराव्या लागतात.एवढे असूनही स्थितप्रज्ञ जीवन आणि कितीही दु:ख असले तरीही त्यांच्या चेहर्‍यावर दु:खाचा लवलेश नसतोच उलट नेहमी हास्य असते असेही थोरात महाराजांनी स्पष्ट केले.

नाथ संप्रदायाचे वारकरी संप्रदायावर अगणित उपकार आहेत. मायेची पाखर करतो तो नाथ!माणसावर प्रेम करतो तो नाथ आहेच,मनुष्येतर प्राण्यांवर प्रेम करणारा नाथच. नाथ जिथे राहतात त्याला धाम म्हणतात.

जडावर प्रेम करतो तोही नाथ.त्रिशूल,बासरी, धनुष्य, पाषाण,वृक्षवल्ली,रेडा,गायी अशा सजीव व चेतन,अचेतन वस्तुवरही नाथांनी प्रेमच केले असे सांगत महारांजांनी ज्ञाननाथ सोडून इतर पाचही नाथांना पत्नी वियोगाचे दु:ख सहन करावे लागल्याचे सांगितले.

वारंगवाडी ता.मावळ येथे अखंड हरिनाम सप्ताह्याला प्रारंभ झाला. महाशिवरात्रीच्या पूर्वी सुरू असलेल्या या नाम यज्ञात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.शनिवार (दि 2) पासून अखंड हरिनाम सप्ताह्याचा प्रारंभ झाला.दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, कलशपूजन, ग्रंथपूजन, विणापूजन,टाळ व मृदुंगपूजन करण्यात आले.श्री.स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस) यांच्या आशीर्वादाने सुदर्शन भजनी मंडळ, सुदर्शन तरुण मंडळ, ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे.

मावळ तालुक्यातील कीर्तनकार,प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य,सांप्रदायिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी सहभागी होत आहे. मावळ तालुका दिंडी समाज, देहू, आळंदी पंढरपूर वारीतील वारकरी यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.

नामसाधना सोहळ्याचे हे 21 वे वर्षे आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तन,मन,धनपूर्वक गावकरी सहभागी होत आहे. पहिल्याच दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त अभिषेक करण्यात आला.काकड आरती,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ, हरिकिर्तन, हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम होत आहे.अनुक्रमे रामायणाचार्य उमेश महाराज दुडे, चिंतनकेसरी भरत महाराज थोरात,गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत, वारकरीदर्पण संत साहित्याचे अभ्यासक सचिन महाराज पवार यांची किर्तने होतील. वारकरीभूषणआबा महाराज गोडसे यांच्या काल्याच्या कीर्तनाने बुधवार (दि 6) ला सोहळ्याची सांगता होईल.

व्यासपीठ चालक धर्मनाथ चव्हाण, दिपक वारिंगे, गेणभाऊ नखाते,वरसू नाना नखाते,दत्तात्रय वारिंगे, निर्मला वारिंगे,अहिल्या मांडेकर,पारूबाई शिंदे,संगीता खोंडगे,सुधा वारिंगे, सुप्रिया कलावडे, प्रांजली कारके, ऋतुजा शिंदे,कांचन वारिंगे,ऋचा वारींगे व्यासपीठ चालक आहेत.

प्रत्येक दिवशी अन्नदान करण्यात येत आहे. शुक्रवार ( दि 8 )महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्या स्पर्धकास पैठणी, सोन्याची नथ, घड्याळ,चांदीचा छल्ला आणि माॅप अशी बक्षीस देण्यात येणार आहे. शुक्रवार (दि.8 )ला श्रीराम कलाप्रासाधिक भजनी मंडळ पवळेवाडी यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. ब्राह्मणवाडी, वराळे,सांगवी,राजपुरी,कातवी, नाणोली तर्फे चाकण,आंबी, मंगरूळ,गोळेवाडी या गावातील मंडळांचा हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी (दि 9) श्री संगमेश्वर मंदिर येथे सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.सुदर्शन तरुण मंडळ, भजनी मंडळ, ग्रामस्थ कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

सप्ताहाचे पहिले पुष्प हभप ओंकार महाराज दुडे यांनी गुंफले त्यांनी हेचि थोर भक्ती आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची हया संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करत देवाला आवडणारी भक्तीचे महात्म्य सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.