Pune : फडणवीसांचा ‘गृह खात्यात जीव’ वा ‘अजितदादांवर अविश्वास’?
एमपीसी न्यूज – प्रलंबित व प्रचलित ‘शासकीय सेवक भरतीच्या’ श्रेयजीवी नमो रोजगार मेळाव्यात, (Pune) उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवारांना गृहखाते मात्र न देण्याचे जाहीर विधान केले. वास्तविक पाहता, अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद शेअर करून, शिंदे सेनेचा आक्षेप झुगारून अर्थखातेही दिले. असे असतांना अजित पवारांच्या विश्वसनीयतेवर, कार्यक्षमतेवर वा हेतुवर आक्षेप उपस्थित करण्यामागचे गौडबंगाल काय? हे देखील भाजपने जाहीर करावे, या आशयाची पोस्ट काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.
राज्यातील ‘भाजप पुरस्कृत’ त्रिकुट सरकारने प्रलंबित व प्रचलित शासकीय भरतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून वरील विधान केले. एकीकडे राजकीय घरफोडीने शिंदे सेनेसोबत सत्ता व संख्याबळ असूनही सत्ता चालवता येत नसल्याने (जनतेने भाजप विरोधी कौल दिलेल्या) राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना रेड कार्पेट टाकून उपमख्यमंत्री पद दिले.
वास्तविक दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे जाहीर आरोपही केले होते. मात्र भाजप’ला अखेर पंतप्रधानांचे आरोप हे सारासार खोटे व निराधार असल्याचे जाणवले व अजितदादांची कर्तबगारी, कार्यक्षमतां लक्षांत येताच 8 दिवसांत अजितदादा व सहकाऱ्यांना (पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणाऱ्या) चारित्र्य संपन्न ‘भारतीय जनता पक्षाने’ मंत्रीपदे देऊन, सत्तेत वाटा देखील दिला.
Chinchwad : चिंचवडमधून अपहरण झालेल्या मेंढपाळाची बीड जिल्ह्यातून सुटका
मात्र त्यांना गृहखाते न देण्यामागे काय गौडबंगाल आहे? असा उपहासात्मक सवालही तिवारी (Pune) यांनी केला आहे. राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पकडण्यात आलेले कोट्यावधींचे ड्रग पुन्हा विकले जात असल्याचे व त्याचे पैसे हवाला मार्फत दिल्ली येथे जात असल्याचेही उघडकीस आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांनी दिलेल्या माहितीमुळे पुणे पोलीस अघिकाऱ्यांवर ‘संविधानीक कर्तव्यपुर्तीचे संस्कार असल्याची बाब समोर येणे ही देखील समाधानाची बाब असल्याचे गोपाळ तिवारी यांनी म्हंटले आहे.