Chinchwad : पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – देशी बनावटीचे पिस्टल (Chinchwad) व दोन जिवंत काडतुसासह एका तरुणाला गुरुवारी (दि.15) पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली आहे.

जतिन उर्फ सोनू बिपीन टाक (वय 29 रा.पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित सानप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Moshi : बंदोबस्तासाठी चाललेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून (Chinchwad) आरोपीला झुलेलाल मंदिरा जवळ अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपयांची देशी बनावटीची पिस्टल व 1 हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.