Pimpri : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची वार्षिक सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची वार्षिक(Pimpri ) सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

संघटनेने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा संघटनेचे (Pimpri )सचिव जयंत कड यांनी घेतला. संघटनेने लघुउद्योजकांना वाढीव आलेल्या वीज बिलासाठी महावितरण कार्यालय भोसरी येथे आंदोलन करून वीज बिलाची होळी केली होती. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे शास्तीकर सरसकट माफीसाठी सतत पाठपुरावा केला. शास्तीकर सरसकट माफ करून घेतला. महावितरण भोसरी डिव्हिजनचे तीन सब डिव्हिजनमध्ये विभाजन करण्यात आले.

Talegaon : बँकेत बोगस खाते काढून व्यावसायिकाची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक

खजिनदार संजय ववले यांनी सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षाचा ताळेबंद वाचून सभेत मांडला. तो सर्वानुमते मंजूर कण्यात आला. सभेला अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मार्गदर्शन केले. संघटना नवीन सभासद वाढविण्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच ज्या भागातील सभासदांना काही समस्या आल्यास त्यांच्याच परिसरातील संचालकांनी व इतर संचालकांच्या माध्यमातून ती समस्या सोडविण्याकरिता त्या सभासदाला मदत करण्याचे ठरविण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे, प्रमोद राणे, सचिन आदक तसेच स्वीकृत संचालक तात्या सपकाळ, माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, सुरेश गवस, नरेंद्र निकम, प्रमोद दिवटे, अजय लोखंडे, गौरंग बनकर, गणेश खेडकर संघटनेचे सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव जयंत कड यांनी केले. तर आभार संजय जगताप यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.