Talegaon : बँकेत बोगस खाते काढून व्यावसायिकाची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकाला (Talegaon Fraud) बँकेत खाते काढण्यास सांगून बोगस खात्याद्वारे व्यावसायिकाची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार तळेगाव दाभाडे येथील पी. पारसिक सहकारी बँक येथे 2016 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी गिरीश हरिश्चंद्र करंडे (वय 49 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरून प्रतिक मच्छिंद्र पाबळे (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alandi:ट्रकच्या धडकेत दुचाकावरील तरूणीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने पी पारसिक सहकारी बँकेत फिर्यादी यांच्या अधीराज लॅन्ड डेव्हलपर्स या कंपनीच्या नावाने खाते काढण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून (Talegaon) 2016 साली खाते काढले. फिर्यादी यांनी त्यांच्या व्यवसायाचे पैसे त्या खात्यावर टाकले. मात्र ते खाते बोगस असून त्याद्वारे फिर्यादीचे तब्बल 55 लाख 3 हजार 367 रुपये लंपास केले. फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.