Moshi : बंदोबस्तासाठी चाललेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज – बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस (Moshi)कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) मोशी येथे घडला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी येथे संतोष गोरक्ष भराट(Moshi) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली आहे.यावरून दुचाकी एमएच 14 एलजी 5317 चा चालक चंद्रकांत काजेप्पा तळकेरी (वय 27 रा. चऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dapodi : दापोडी मेट्रो स्टेशनवर आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मयुर घाडगे हे दोघे बंदोबस्तासाठी दुचाकीवरून आळंदीकडे जात होते. यावेळी फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.