Chakan : मद्यपानाची लहर बेतली जीवावर; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  दारू पिण्याची लहर तरुणाच्या जीवावर बेतली. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण (Chakan) येथे घडला.

Chakan : पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून व्यावसायिकाची दोन लाखांची फसवणूक

याप्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल शिरवले यांनी शनिवारी (दि. २६) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नीकेश हे दारू पिण्यासाठी दुचाकी वरून जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने भोयर यांच्या गाडीला धडक दिली.  यात भोयर गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात दोन जून रोजी घडला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली होती.

या तपासात मयत निकेश दिलीप भोवर (वय 29) याची ओळख पटली. त्यानंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

https://youtu.be/a5tsOUp4Dkc?si=BnUfPYn1-S9uvqlr

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.