च-होली – मोशीत राष्ट्रवादीचे पॅनेल विजयी होणार – विनया तापकीर

एमपीसी न्यूज – केवळ आश्वासनांच्या गाजरांची शेती करणा-यांना विकास काय असतो याची माहिती नाही. कारण एका लाटेमुळे ही ‘भुछत्रे’ उगवली आहेत. त्यांना च-होलीतील मतदार कदापी स्वीकारणार नसून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास, प्रभाग क्रमांक तीन च-होली-मोशीच्या उमेदवार व नगरसेविका विनया तापकीर यांनी व्यक्त केला.

च-होली येथे तापकीर बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम रामचंद्र खेडकर (अ), मंदा उत्तम आल्हाट (ब), विनया प्रदीप (आबा) तापकीर (क), संजय संतुराम पठारे (ड) उपस्थित होते. राहुल काटे, संजय पवळे, पिंठू काटे, काळूराम रसाळ, एकनाथ रसाळ, नामदेव रसाळ, शांताराम तापकीर, कांताराम तापकीर, मुरलीधर तापकीर, अतुल तापकीर, संतोष आखाडे, प्रभाकर तापकीर, बाळासाहेब लांडगे, सुभाष मोळक, नामदेव तापकीर, बाळासाहेब गरुड, बन्सीलाल रसाळ, संदीप काटे, प्रमोद काटे, नाथु आमराळे, गणेश काटे उपस्थित होते. 

‘तुझं माझं जमेना, अन् तुझ्या वाचून करमेना,’ अशी शिवसेना आणि भाजप या दोन मित्रांची बनवेगिरी सुरू आहे. मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे तापकीर म्हणाल्या. 

राष्ट्रवादीने शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पिंपरी-चिंचवड शहर ‘स्मार्ट’ शहर आहे. च-होलीत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. मतदारांनी राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी विजयी करून विकासाला साथ देण्याचे आवाहनही, तापकीर यांनी केले. 

राष्ट्रवादी उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू आहे. काटे वस्ती, च-होली फाटा, शामा इस्टेट, चोविसवाडी असा संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. प्रचारपत्रके वाटली, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.