लायन्स क्लब प्रभाततर्फे मतदान जनजागृती अभियान

शहरातील 11 चौकांमध्ये उपक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – सुशासनाची मागणी करताना आपला योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदानाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बजवावा, यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभाततर्फे मतदान जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील खंडुजीबाबा चौक येथून या अभियानास प्रारंभ झाला. 

यावेळी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, सचिव विकास कोलते, संजय शहा, प्रशांत झरकर, किरण जाधव, निलेश ढोबळे, दिपाली झरकर, मुकूंद खैरे, अ‍ॅड. विराज पाटोळे, अरविंद म्हस्के आदी उपस्थित होते. शहरातील एकूण 11 चौकांमध्ये या मतदान जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 
अ‍ॅड. बिपीन पाटोळे म्हणाले की, आज मतदानाबाबत सामान्य नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून येतो. त्यामुळे त्यांना लोकशाहीत मतदान किती आवश्यक हे सांगण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सशक्त शासन व्यवस्थेकरिता प्रत्येकाने 21 फेब्रुवारी रोजी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.