शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

मोठ्या आवाजात बोलू नका असे सांगितल्याने टोळक्याची तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – मोठ्या आवाजात बोलू नका, असे सांगितल्याने दहा जणांच्या टोळक्याने तिघांना घरात घुसून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.19) रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवड, उद्योगनगर येथे घडली.

मुन्ना रामेश्वर महतो (वय 24), उमेश कुमार सुखदेव (वय 38), राजनकुमार नरेश महतो (वय 21), विकासकुमार राम आशिष पासवान (वय 19), रणजितसिंह कुमार शंकर (वय 27), कमलेशकुमार गडाधर महतो (वय 22), सत्यनारायण जवाहर साह (वय 32, सर्व रा. उद्योगनगर, चिंचवड), अशी अटक केलेल्यांची नावे असून त्याचे साथीदार पप्पू कुमार कामेश्वर, राकेश (रा. काळेवाडी) आणि उमेश रॉय (रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय यादव (वय 28, रा. उद्योगनर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड, उद्योगनगर येथील बांधकाम साईटवर आरोपी काम करत आहेत. रविवारी ते शेर शायरी करत होते. फिर्यादी विजय यादव याने आरोपींना मोठ्या आवाजात बोलू नका, असे सांगितले. त्याच्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. आरोपींनी विजय याच्या घरात घुसून त्याला लाकडी पट्टीने, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यामध्ये यादव याचा डावा हात फॅक्चर झाला आहे. विजय यादव याचा साथीदार शिवकुमार यादव आणि जितेंद्र याला देखील आरोपींनी मारहाण केली आली आहे. चिंचवड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news