शनिवार, डिसेंबर 3, 2022

पुण्यातील धायरी आणि वडगाव बुद्रुक येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील धायरी येथून 17 वर्षीय तर वडगाव बुद्रुक येथून 15 वर्षीय मुली बेपत्ता झाल्या आहेत.

 

धायरीतील 17 वर्षीय मुलगी देवळातून जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परत आलीच नाही. याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकांनी आपल्या तक्रारीतून व्यक्त केला. तर दुस-या घटनेत वडगाव बु. येथून बेपत्ता झालेली 15 वर्षीय मुलीला देखील अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली.

 

याप्रकरणी सिंहगड रोड आणि कोंढवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.

Latest news
Related news