श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेला ‘उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील बँकाच्या कामगिरीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांच्या वतीने चिंचवडमधील श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेला 2016 सालचा कै. पद्‌मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कारने नुकतेचे गौरवण्यात आले. हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, संचालक शंकर वाडकर, अशोक काळभोर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनटक्के, व्यवस्थापक राजेंद्र बाबार आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी बँकेने आयोजकांना सादर केलेल्या प्रश्नावलीच्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार 50 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित या बँकेची निवड करण्यात आली.

 

बँकेची स्थापना 1999 साली झाली असून बँकेच्या संभाजीनगर, भोसरी येथे शाखा आहेत. बँक पूर्णपणे संगणकीकृत असून ग्राहकांना कोअर बँकींगद्वारे आरटीजीएस, एनईएफटी व एटीएम सुविधा देत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.