महाराजा ग्रुपचे गणेश नाणेकर यांच्यावर चाकणजवळ जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – चाकण येथील महाराजा गृपचे अध्यक्ष गणेश नाणेकर यांच्यावर चाकणजवळ धारदार हत्याराने अज्ञातांनी वार केले. या घटनेत नाणेकर यांच्या डोक्यात आणि पोटात चॉपरने वार करण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

 
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लाखोर कोण आहेत तसेच या हल्ल्यामागील कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.  नाणेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.