आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावे – आयुक्त कुणाल कुमार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही योग्य पद्धतीने आयोजन केले होते. ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांकडून केला जात असून आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले असून पराभूत उमेदवार नेहमी अशा प्रकारचे आरोप करतात, अशा शब्दांत त्यांनी पराभूत उमेदवारांचे आरोप धुडकावून त्यांनी लावले. येत्या दोन दिवसांत सर्व आकडेवारी वेबसाईटवर टाकण्यात येईल.

ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पराभूत उमेदवारांनी आज पुण्यात आंदोलन केले. बॅलेट पेपरद्वारे पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही पराभूत उमेदवारांनी केली आहे.

या मोर्चाबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, ईव्हीएम मशिनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून पराभूत उमेदवारांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.