सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

दूचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव दूचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.16) सायंकाळी पाचच्या सुमारास जांबे, नेरे येथे घडली.

भोलासिंह उर्फ चंचलसिंह अमरिंकगसिंह कुसर (वय 35, रा. जांबे, मुळशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर, सहप्रवासी गोटु वसंत गायकवाड (वय 35) हा गंभीर जखमी झाला आहे.  याप्रकरणी परमेश्वर गोविंद साळुंखे (वय 42, रा. जांबे, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोलासिंह आणि गोटू गुरुवारी सायंकाळी हिंजवडी येथून दुचाकीवरुन जात होते. भोलासिंह हा दुचाकी चालवत होता. तर, गोटू पाठीमागे बसला होता. जांबे येथून जात असताना भोलासिंह याचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. त्यामध्ये भोलासिंह याचा मृत्यू झाला. तर, गोटू हा गंभीर जखमी झाला आहे. हिंजवडी ठाण्याचे फौजदार एस.ए. देशमुख तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news