पिंपरी पालिकेच्या प्राणी व सर्पमित्रांच्या भरतीमध्ये गडबड झाल्याचा लोकशाही संस्थेचा आरोप


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मानधनतत्वार भरण्यात आलेल्या  प्राणी व सर्पमित्रांच्या नियुक्तीमध्ये गडबड झाल्याचा आरोप, लोकशाही संस्थेने केला आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेने प्राणी मित्रांची भरती करण्याची राबविलेली प्रक्रिया सदोष आहे. या सदोष पद्धतीमुळे अनुभवी, कुशल आणि सर्व माहिती असणा-या प्राणीमित्रांवर अन्याय होत आहे. पालिकेने राबविलेल्या भरती प्रक्रियेमध्ये गडबड झाली आहे, असा आरोप संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे यांनी केला आहे.

अनेक वर्षांपासून प्राणी, सर्प हाताळणे व्यवस्थित कार्य करणारे, जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडणा-यांना डावलून इतरांना प्राणीमित्र म्हणून नियुक्त केले आहे. भरती प्रक्रिया शंकास्पद असल्यामुळे तातडीने रद्द करण्यात यावी. पुन्हा नव्याने निरपेक्ष व लोकशाही पद्धतीने प्राणी मित्रांची भरती प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबवावी. तसेच  प्राणी व सर्पमित्रांची भरती सेवेतील संख्येत 50 टक्के वाढ करावी, अशी मागणी अजय लोंढे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.