लायन्स क्लब ऑफ आकुर्डी सफायरच्या अध्यक्षपदी शिरीष हिवाळे

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ आकुर्डी सफायरच्या अध्यक्षपदी शिरीष हिवाळे तर सचिवपदी शोभा कदम यांची निवड करण्यात आली. सिद्धी बँक्वेट हॉल येथे पार पडलेल्या पदग्रहण कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.

पदग्रहण सोहळ्यासाठी प्रांतपाल गिरीशभाई मालपाणी, ओमप्रकाश पेठे, राज मुछाल, रवींद्र सातपुते, सुनील जाधव, बी. के. कपूर, विनय सातपुते, नवनाथ म्हेत्रे, क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीसोबत खजिनदार राजकुमार राऊत यांची देखील निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना उपप्रांतपाल रमेशभाई शहा यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. गतवर्षी केलेल्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच आगामी वर्षात करण्यात येणारी महत्वपूर्ण कामांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. समाजसेवेचे व्रत घेऊन लायन्स क्लब पुढे चालत राहील. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष हिवाळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.