प्रभाग क्रमांक 21 अ पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी एकुण दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील तीन जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता निकडणूक रिंगणात सात उमेदवार असणार आहेत. भाजप-आरपीआयच्या वतीने हिमाली कांबळे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय सूर्यकांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन बंडखोरी केली आहे. ही लढत थेट भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणार असली तरी बंडखोरीचे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे.

या बाबत माहिती देताना निवडणूक अधिकारी विजय दहिभाते यांनी सांगितले की, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन पर्यंत नितीन रोकडे, योगेश घोडके,आणि यशवंत नडगम यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच हिमाली कांबळे यांनी भाजप आणि रिपाई असे दोन एबी फॉर्म दाखल केले होते. त्यातील रिपाई कडून दाखल करण्यात आलेले फॉर्म मागे घेतला असून त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता सात उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. यामध्ये भाजप कडून हिमानी कांबळे, राष्ट्रवादी कडून धनंजय गायकवाड , माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, तसेच अपक्ष उमेदवार खेमदेव सोनवणे, भाऊसाहेब मोरे, प्रिया वाघमारे व दादा गायकवाड़ हे रिंगणात असणार आहेत.
११ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.