Pimpri: पिंपरी पालिकेच्या 751 रखवालदारांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मालमत्तांच्या 24 तास संरक्षणासाठी विविध ठेकेदारांमार्फत 751 रखवालदार मदतनीस नेमण्यात आले आहेत. त्यांची मुदत संपली होती. आता त्यांना पुन्हा ऑक्टोबरपर्यंत स्थायी समितीने मुदतवाढ दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयासह आठ क्षेत्रिय कार्यालये, 16 करसंकलन कार्यालये, प्रेक्षागृह, उद्याने, पाण्याच्या टाक्या, भाजी मंडई अशा विविध सुमारे 750 मालमत्ता आहेत. शहरात ठिकठिकाणी असणा-या या मालमत्तांच्या संरक्षणासाठी पालिकेचे कायमस्वरुपी रखवालदार नियुक्त आहेत. परंतु, रखवालदारांची संख्या अपुरी आहे. पालिकेच्या मालमत्तांचे 24 तास संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मदतनीस म्हणून काही रखवालदारांची नेमणूक केली आहे.

मदतनीस म्हणून ठेवलेल्या रखवालदारांना एक जानेवारी 2017 पासून वेळोवेळी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पालिका मालमत्तांची सुरक्षा लक्षात घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत या मदतनीसांना मुदतवाढ देण्यात आली. पालिकेच्या विविध मालमत्ता, पाण्याच्या टाक्या व इतर महत्वाच्या ठिकाणी 457 रखवालदार मदतनीस नेमण्यात येणार आहेत. एक वर्ष कालावधीसाठी या मदनीसांकरिता 10 कोटी 97 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. शहरात पालिकेच्या 131 प्राथमिक आणि 19 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांवरही 24 तास सुरक्षा ठेवण्यासाठी 294 रखवालदार मदतनीस नेमण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.