पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू; मृतांचा आकडा 25 वर


एमपीसी न्यूज – स्वाईनफ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून स्टर्लिंग रुग्णालयात 73 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईनफ्लूमुळे मृतांचा आकडा 25 झाला आहे. 

सातारा येथील रुग्णाला 14 जुलै रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून दाखल करण्यात आले. प्रकृती अतिशय गंभीर होऊन रविवार (दि. 23) रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. 

पिंपरी चिंचवड शहरात मागील काही महिन्यापासून ‘स्वाईन फ्लू‘ने ठाण मांडले असून गेल्या सहा महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यात शहरातील 198 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सध्या 34 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून 25 रुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.