दारू पिल्याचा बहाणा करून नागरिकांना लुबाडणा-या तिघांना अटक, 10 गुन्हे उघडकीस


एमपीसी न्यूज -दारू पिल्याचा बहाणा करून पादचारी इसमांच्या जवळ जात त्याच्या अंगाशी लगट करणा-या टोळीचा गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी छडा लावला असून याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत 10 गुन्हे उघड झाले असून पोलिसांनी 3 लाख 62 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.आकाश बाळू धुमाळ (रा.गांधी चौक, रामोशी आऴी, हडपसर, पुणे), रोहन बलराम जाधव (रा.हिंगणे मळा, हडपसर, पुणे) आणि अक्षय भारत कंटाळे उर्फ जगताप (रा.महादेव नगर, मल्हार कॉलनी, गोपाळकट्टी, मांजरी, पुणे) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन महिण्यापासून पादचारी इसमांना लुबाडण्याच्या घटना होत होत्या. याचा छडा लावण्यासाठी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी एक पथक नेमले होते. या पथकानी मार्केटयार्ड परिसरातील सीसीटीव्हि फुटेजची तपासणी करुन संशयीत आरोपींची शोधमोहीम सुरू केली. दरम्यान 23 जुलै रोजी या पथकातील पोलीस शिपाई बी.एम.मुसळे व एस.पी,पोळेकर हे बिबवेवाडी येथील रविराज क्रु मॉलजवळ सापळा लावून थांबले असता आकाश धुमाळ आणि रोहन जाधव यांना एका पादचारी इसमाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या अंगाशी लगट करून खिशातील पैसे काढताना रंगेहात पकडले. त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी तिसरा आरोपी अक्षय कंटाळेसह पुणे शहरात 10 गुन्हे केल्याचे कबुल केले.

आरोपींनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हे, सहकारनगर, लष्कर, भारती विद्यापीठ आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार असे एकुण 10 गुन्हे उघडकीस आले.या गुन्ह्यातील 2 लाख 22 हजार 451 रुपयांची रोख रक्कम, 50 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन दुचाकी असा 3 लाख 62 हजार 451 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई परिमंडळ दोन चे पोलीस उप आयुक्त प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ.पवार, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, विजय देशमुख, पोलीस उप निरीक्षक होनराव, धुमाळ, पोलीस नाईक मोरे, धोत्रे, पडळकर, वारुळे, पोलीस शिपाई शेख, घुले, मुसळे, पाळेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.