अखेर शास्ती कराचा आदेश महापालिकेत दाखल; सुमारे 32 हजार बांधकामांना शास्तीतून सूट

मात्र आंमलबजावणीच्या काही बाबतीत स्पष्टता नाही


एमपीसी न्यूज –  मुख्यमंत्र्यानी 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील जाहीर सभेत दाखवलेला शास्तीच्या सवलतीचा आदेश अखेर पिंपरी महापालिकेत महिना भरांनी दाखल झाला. यामधये 600 चौरस फुटाच्या सुमार 32 हजार बांधकामांना सुट मिळणार आहे. मात्र या आदेशात काही बाबींची स्पष्टता नसल्यामुळे प्रशासनाला अंमलबजावणीत अडचण येणार आहे.

शहराला मोठा दिलासा देणारा आशस्ती कराचा आदेश महापालिकेमध्ये अखेर आला आहे. यामध्ये दिलेल्या सवलतीनुसार 600 चौरसफूटापर्यंतच्या बांधकामात शास्ती आकारण्यात येणार नाही, 601 ते100 चौरसफूटापर्यंतच्या बांधकामाना 50 टक्के शास्ती कराची सवलत मिळणार आहे. तर 1001 चौरसफुटाच्या बांधकांमाला मालमत्ता कराच्या दुप्पट दराने म्हणजे पुर्वी होती तीच शास्त लागणार आहे.

या नियमांनुसार  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 32 हजार बांधकामे आहेत ज्यांची एकूण 72 कोटी शास्ती माफ होणार आहे. 600 ते 1000 चौरसफूटांची 18 हजार बांधकामे आहेत त्यांच्याकडून 106 कोटी शास्तीची वसूली होते. तर 1 हजारच्या पुढे 20 हजार बांधकामे आहेत. यासा-यांचा तपशल घेतला असता या आदेशामध्ये कोणत्या सालापासूनची बांधकामांना यामध्ये सूट मिळणार आहे हेनुमुद केलेले नाही, महापालिकेच्या 2 टक्के लावल्या जाणा-या शास्तीबाबत यात कोणताही निर्णय नाही, ज्यांनी आत्तापर्यंत शास्ती भरली आहे त्यांचाही यात समावेश आहे का अशा अनेक बाबी यामध्ये स्पष्ट  केलेल्या नाहीत. त्यामुळे  या आदेशाचे पालन करताना प्रशासनाला अडचणी येण्याची शक्यता आहे. तुर्तास 600 चौरसफुटाच्या बांधकांमाना मात्र दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याहदेदीतील सुमारे 70 हजार बांधकामांना शास्ती लागते. त्यानुसार 2012 ते 2017 या पाच वर्षात शास्तीकरापोटी 82 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.