पिंपरी-चिंचवड शहरात शिव जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा जयघोषात आज (बुधवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये  शिवजयंती साजरी करण्यात आली.

भगवे झेंडे हातात घेवून दिल्या जाणार्‍या घोषणांमुळे शहरातील संपूर्ण वातावरण शिवमय होऊन गेले होते. शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी भगव्या पतका, भगवे झेंडे लावण्यात आले होते.

काही ठिकाणी मंडळांनी किल्ल्यांचे देखावे उभारले होते. त्यासमोर आकर्षक आणि भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तोफांच्या प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या होत्या. मंडळाच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांचे पथक सहभागी झाले होते. चिंचवडगावातील मिरवणुकीमधील बाल शिवाजी सगळ्यांचे लध वेधून घेत होता.

पिंपरीगावीतील अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला शगून चौकातून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा आकर्षक सेट, पालखी, हत्ती, घोडे, उंट आहेत.  400 मुला-मुलींचे लेझिमचे पथक, 150 मुला-मुलींचे मर्दानी खेळाचे सादरीकरण केले जात आहे. तसेच  भगवे झेंडे घेऊन स्केटिंग वर मुलांचे थरारक प्रात्यक्षिक, मुला, मुलींचे मल्लखांबाचे, योगसानाचे प्रात्यक्षिक, मुलींचे जिमन्यास्टीकचे प्रात्यक्षिक पथक सहभागी झाले आहे.  

त्याचबरोबर बँड पथक, वारकरी भजनी मंडळाचे पथक, ढोल ताशांची 4 वेगवेगळी पथके, बंगाली महिलांचे शंखनात वाद्यपथक, केरळी बांधवाचे वाद्यपथक, पंजाबी बांधवांचे भांगडा ढोलपथक, राजस्थानी, सिंधी बांधवांचे वाद्यपथक सहभागी झाले आहे.

पूर्णानगर येथील शिवसाई प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतंर्गत शिवसाई व्याख्यानमाला होणार असून बुधवारी समाज प्रबोधनकार शारदा मुंडे यांचे ‘शिवबाची जिजाऊ’ या विषयावर सायंकाळी साडेसात वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तीन दिवस ही व्याख्यानमाला चालणार असून, 16 मार्चला ज्येष्ठ विश्‍लेषक विश्‍वास मेहंदळे यांचे ‘मला भेटलेली माणसे’ या विषयावर; तसेच 17 मार्चला ‘स्वराज्याचे मानकरी’ शिवप्रबोधनकार डॉ. युवराज कदम यांचे व्याख्यान होणार आहे. 

जाधववाडी येथील छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्रमंडळातर्फे कै. धोडीभाऊ मळेकर क्रीडांगण  येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. 82 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.  विनायक ढोबळे, सुहास शेळके, प्रशांत घोरपडे, नीलेश गायकवाड, परशुराम उकिरडे, बाळासाहेब मळेकर, सुभाष घोगरे, नाना सरोदे, गणेश भुजबळ, अण्णा आढाळे, संदीप घोलप, अजित क्षीरसागर, प्रवीण नाईकवाडे, राजू खरात, प्रशांत कांबळे, विशाल चोबे, तुषार आदक आदी उपस्थित होते. 

भीमशाही युवा संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांच्या हस्ते एच. ए. कंपनीसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नितीन कसबे, शरद गायकवाड, विजय जोगदंड, अमोल जमदाडे, बालाजी सोनकांबळे, रमेश उबाळे आदी उपस्थित होते. 

जाधववाडीतील शिवप्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व छत्रपतीच्या जयघोषात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत व शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली.  शिवभक्तांनी शिववंदना म्हटली; तसेच शिवप्रतिमेचे पूजन करून शिवआरती करण्यात आली.
"jayanti
"jayanti
"jayanti
"jayanti
"jayanti
"chinchwad
"chinchwad

पिंपरी शिवजयंती
"pimpri
"pimpri
"pimpri
"pimpri
"pimpri

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.