पत्रकार बाळासाहेब शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहर, पिंपरी -चिंचवड पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब शिंदे यांचे दिर्घ आजाराने आज (बुधवारी) सायंकाळी निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. बाळासाहेब शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
बाळासाहेब शिंदे हे हास्य विनोदाचे एकपात्री कलाकार होते. मागील वर्षी पालिकेच्या भोसरी महोत्सवात त्यांना विशेष पुरष्काराने गौरविण्यात आले होते.