गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

लोणावळ्यात जुन्या नोटा असलेले 60 लाख रुपये पकडले

एमपीसी न्यूज – चलनातून बाद झालेल्या 1 हजार  रुपयांच्या नोटा असेलेले 60 लाख रुपये बदलून घेण्यासाठी आलेल्या चार जणांना लोणावळा शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.16) रात्री साडेअकराच्या सुमारास  लोणावळ येथे करण्यात आली. 
 

श्याम गोरख शिंदे (वय 45, एरंडवणे, पुणे), रोहीदास जवाहर वाघिरे (वय 43, रा. वाघिरे आळी, पिंपरीगाव), बालाजी निवृत्ती चिद्रावार (वय 65, रा. वडगावशेरी, पुणे) आणि प्रशांत सुभाष शेवते (वय 45, रा. हडपसर, पुणे) यांच्याकडून जुन्या एक हजार रुपयांच्या नोटा असलेले 60 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

लोणावळा शहर पोलीस गुरुवारी हद्दीत गस्त घालत होते. चार जण जुन्या नोटा असलेले पैसे घेऊन बदलण्यासाठी (एमएच 14 ईवाय 3504) या मोटारीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कैलास पर्बत हॉटेल जवळील नारायणीधाम पोलीस चौकीजवळ सापळा रचत त्यांना पकडले. 

बालाजी चिद्रावार व प्रशांत शेवते यांनी जुन्या नोटा बदलून नवीन नोटा देतो, असे सांगितले होते. त्यामुळे नोटा घेऊन आल्याचे श्याम शिंदे यांनी सागितले. लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.

"dipex"

Latest news
Related news