Pune : ऑनलाईन शूज घेणे पडले महागात; रिफंडच्या नावाखाली 77 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : ऑनलाइन खरेदी केलेल्या शूजचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने बँक खात्यांची माहिती घेऊन 77 हजारांची फसवणूक केल्याची घटना धायरी येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणी सोबत घडली आहे.
ही घटना रविवारी(दि.23) सकाळी11 च्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी धायरी येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला क्लब फॅक्टरी डॉट कॉम या वेबसाईटवर एक शूज आवडल्याने तो खरेदी करण्यासाठी तिने आयडीबीआय बँकच्या डेबिट कार्डचा वापर करून 1हजार 449 रुपयांचे पेमेंट करून शूज ऑर्डर केला परंतु ऑर्डर करून देखील ऑर्डर कन्फर्म झाल्याचा मेसेज न आल्याने तरुणीने क्लब फॅक्टरी डॉट कॉम या साईटच्या कस्टमर केअरला फोन लावला.फोनवरील व्यक्तीने तरुणीचा विश्वास संपादन करून शूज चे पैसे रिफंड करतो असे सांगून तिच्या आणि तिच्या त्यांच्या आईच्या बँक खात्यांची माहिती घेतली.
आणि त्यानंतर तरुणीच्या आणि तिच्या आईच्या बँक खात्यातून एकूण 77 हजार 213 रुपये परस्पर काढून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड पोलिस स्टेशन  करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.