Pimpri : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरीत निर्देशने

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज ( मंगळवारी) सरकार विरोधात घोषणा देवून निर्देशने करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, दत्त भोसले, गोकुळ रावलकर, दिलीप साळवे, लखन लोंढे, जेकब मेथ्यव , नवनाथ लोखंडे , सुदाम बनसोड, अरविंद काळे, बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा, म्हातारपणी पेंशन मिळावी,बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, ओला उंबर या कंपन्यांवर बंद आणावी,रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत, यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

बाबा कांबळे म्हणाले की ,  महाराष्ट्रातील सर्व आर.टी.ओ.कार्यालयावर हे आंदोलन होत आहे. रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, नवीन नियम आणि जाचक अटीमुळे रिक्षा चालकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यास रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण होईल हे राज्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले याप्रसंगी कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे, आम्हाला पेंशन मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.